पुणे : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.
या प्रकरणाचा तपास पोलीस योग्य रीतीने करत नसल्याचा आरोप भाजपचे नेते गेले अनेक दिवस करत आहेत. परंतु आज पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण प्रकरणाचा सविस्तर अहवाल पोलीस महासंचालकांसह राष्ट्रीय महिला आयोगाकडे सादर केलेला आहे. पुणे पोलिसांची तीन पथके सध्या राज्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी या प्रकरणाचा तपास करत असल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे पुण्यात दाखल झाले होते. यामुळे या प्रकरणात तपासाला वेग आल्याचे काल दिवसभरात दिसून येत होते. तसेच पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात देखील घेतले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन कथित कॉल रेकॉर्डिंग्सची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रदेशाध्यक्षांच्या मिरवणुकीला कोरोना नसतो मात्र शिवजयंती वेळी कोरोना समोर येतो !’
- स्वतःला बायकोचे ‘मालक’ समजणाऱ्यांना कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? – चित्रा वाघ
- जावयाची वरात पोलिसांच्या दारात, सासरवाडीचे घर फोडून वीस हजारांवर डल्ला
- याद राखा…विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही; मुनगंटीवारांचा इशारा
- ‘राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही’

