Share

पंजाब निवडणुकांत भाजप भुईसपाट ; शेतकरी आंदोलनाचे पडसाद

Published On: 

पंजाब :  केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे पडसाद आता निवडणुकांमध्ये उमटायला सुरु झाले आहेत.

विरोधकांनी शेतकरी आंदोलनाला विरोधकांनी सशर्त पाठिंबा दिला आहे. यात कॉंग्रेस अग्रेसर आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी एक इंचही मागे हटणार नाहीत, अशी तंबी दिली होती. संसदेच्या अधिवेशनात देखील शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. त्यामुळे पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी काँग्रेसला कौल दिल्याचे दिसतंय.

पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी ८ नगरपालिका, १०९ नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. विशेषतः भाजप खासदार सनी देओल यांच्या मतदारसंघात असलेल्या सर्वच्या सर्व जागांवर भाजप पराभव झाला आहे. तर २९ जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

लोकसभा निवडणुकीत याच गुरदासपूरच्या नागरिकांनी सनी देओलला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं होतं. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नागरिकांनी भाजपला साफ नाकारले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!