🕒 1 min read
औरंगाबाद : शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट प्रकरणात संशयित शांतनू मुळूक याला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी ‘ट्रांझिट अग्रिम जामीन’ मंजूर केला आहे. या प्रकरणात 13 फेब्रुवारी रोजी पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला बंगळुरू येथून अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी शांतनुला दहा दिवसांपर्यंत अटकेपासून संरक्षण देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. शांतनु यांना दिल्लीतील कोर्टासमोर आपली बाजू मांडता येण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी हा तात्पुरता अग्रिम जामीन आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या निकिता जेकबच्या याच प्रकारच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य पीठापुढे सुनावणी झाली तेव्हा न्यायमूर्ती पी. डी. नाईक म्हणाले की, ते बुधवारी हा आदेश पारित करतील. दिल्ली पोलिसांनी सोमवारी आरोप केला होता की, दिशा रवीने निकिता जेकब आणि शांतनू यांच्या साहाय्याने टूलकिट तयार केली होती. या टुलकिटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झाला.
दिशा रवीला मिळाला ‘हा’ दिलासा
दिशा रवीच्या वकिलाच्या बाजूने पतियाळा कोर्टाने पोलिसांना निर्देश दिले की, दररोज दिशा तिच्या वकिलांशी 30 मिनिटे आणि कुटुंबाशी 15 मिनिटे फोनवर बोलू शकते. तिला उबदार कपडे, घरगुती जेवण, पुस्तके, रिमांडची प्रत आणि एफआयआरची प्रत प्रदान केली जावी. दिशाच्या पोलीस कोठडीदरम्यान कोर्टाने हा आदेश दिला आहे.
दरम्यान, दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी मंगळवारी सांगितले की, पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीची अटक कायद्यानुसार करण्यात आली आहे. कायद्यापुढे आरोपी 22 वर्षांचा आहे की 50 वर्षांचा असा भेदभाव केला जात नाही. श्रीवास्तव यांनी पत्रकारांना सांगितले की, जेव्हा लोक म्हणतात की, अवघ्या 22 वर्षांच्या कार्यकर्तीला अटक करण्यात काही चूक झाली आहे, तेव्हा ते चुकीचे आहे.
पोलिसांनी दावा केला होता की, तिने ही टूलकिट ‘टेलिग्राम अॅप’च्या माध्यमातून ग्रेटा थनबर्गला पाठविली होती. यावरून तिला बोलण्यास तयार केले होते. दिशाला 5 दिवसांची कोठडी असून तिची आणखी चौकशी सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिशा रवी – ग्रेटा थनबर्ग यांच्यातील व्हॉट्सअप चॅट्स, वाचा Toolkit बाबत काय म्हणाल्या दोघी?
- रिहानाने पुन्हा खाल्ली माती, गळ्यात गणपतीचं पेंडंट घालून पोस्ट केला टॉपलेस फोटो
- BMCचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच, भाजपची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- दिशा रवी अटकेप्रकरणी महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना बजावली नोटीस
- ‘राहुल गांधी दम असेल तर गुजरातेतून निवडणूक लढवून दाखवा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
