🕒 1 min read
नवी दिल्ली : अमेरिकीची वादग्रस्त पॉप सिंगर रिहाना तिचे गाणे आणि जगावेगळ्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने शेतकरी चळवळीबद्दल ट्विट केले होते, त्यामुळे तिची देशात तसेच परेदशात मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. आता पुन्हा एकदा रिहानाने नवा वाद ओढवून घेतला आहे. एका लिंगरी ब्रँडच्या फोटोशूटदरम्यान तिने गळ्यात गणपतीचं पेंडंट घालून टॉपलेस फोटो शूट केला आहे.
रिहानाने दिली टॉपलेस पोझ
रिहानाने लिंगरी ब्रँडसाठी एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने टॉपलेस पोझ दिले आहे. यावेळी तिने आपल्या गळ्यात गणपतीचे पेंडंट परिधान केले आहे. रिहानाने हा फोटो पोस्ट करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप होत असून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
when @PopcaanMusic said “me nuh wan ya wear no lingerie tonight fa me girl” @SavageXFenty pic.twitter.com/bnrtCZT7FB
— Rihanna (@rihanna) February 15, 2021
फोटो शेअर करताना रिहानाने लिहिले- when PopcaanMusic said “me nuh wan ya wear no lingerie tonight fa me girl”.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांनी केली टीका
रिहानाच्या फोटोवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, ‘मी तो फोटो पाहिलेला नाही, परंतु भारतात सनातन धर्म बर्यापैकी सहनशील आहे. खूप धीर धरणारा आहे. याचा गैरफायदा चित्रपट निर्माते, जाहिरातदार, टुकडे-टुकडे गँग घेते. ज्याला जसे वाटेल तसे तो वागातोय आणि आमच्या देवी-देवतांना लक्ष्य करतोय. परंतु इतर कुठल्या धर्मावर कोणी स्केच काढले तर पूर्ण जगात खळबळ उडते. ही आमच्या धैर्याची परीक्षा आहे. आमच्याकडे धैर्य आहे, पण आता धैर्याची परीक्षा घेऊ नये कारण अति सर्वत्र वर्जित.
वादग्रस्त रिहानाला यापूर्वीही मागावी लागली माफी
रिहाना कायम वादात राहिलेली आहे. रिहानाने तिच्या व्हर्च्युअल रनवे शो सॅव्हेज एक्स फॅन्टीमध्ये लिंगरी कलेक्शन दाखविले होते. या शोसाठी संगीताचे निर्माता कौकोऊ क्लो याने Doom गाणे वापरले होते. या गाण्यात इस्लामची हदीस आहे. प्रेषितांनी सांगितलेल्या वचनांना हदिस म्हणतात. ‘कुराणा’व्यतिरिक्त हदीससुद्धा इस्लामिक संस्कृतीच्या नीतिनियमांबाबत सांगते. हदीसच्या अशा वापरावर नेटकऱ्यांनी तेव्हा तीव्र संताप व्यक्त केला होता, ज्यावर रिहानाने तेव्हा माफी मागितली होती.
महत्वाच्या बातम्या
- दिशा रवी – ग्रेटा थनबर्ग यांच्यातील व्हॉट्सअप चॅट्स, वाचा Toolkit बाबत काय म्हणाल्या दोघी?
- देवगिरी कारखाना सुरु होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन
- शेतीला सुरळीत वीजपुरवठा पाहिजे असेल तर वीजबिल भरावेच लागणार ?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- 15 व्या वर्षात घराबाहेर काढलेल्या कंगनाला नेटकऱ्यांनी केले पुन्हा ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
