नवी दिल्ली : पर्यावरणीय कार्यकर्ती दिशा रवीच्या अटकेप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने राजधानीतील पोलिसांना नोटीस बजावली आहे. दिशाच्या अटकेमध्ये कायदेशीर प्रक्रियांचे उल्लंघन केल्याचे बोलले जात आहे. दिशा रवीने टुलकिट संपादित करून ग्रेटा थनबर्गला ट्वीट करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. या टुलकिटमध्ये शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने भारताविरुद्ध अपप्रचाराची सामग्री होती, असे सांगण्यात येत आहे.
Delhi Commission for Women sends notice to Dy Police Commissioner, Cyber Crime Cell, Delhi Police over Disha Ravi's arrest. Commission asks Police to provide copy of FIR, reasons for allegedly not producing her before local court for transit remand & detailed action taken report. pic.twitter.com/MEZKdcH4VR
— ANI (@ANI) February 16, 2021
महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना पाठिवलेल्या नोटिसीमध्ये दिशाविरुद्ध एफआयआरची प्रत मागितली आहे. दिशाच्या अटकेदरम्यान निश्चित कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही का, असा सवालही आयोगाने विचारला आहे. एवढेच नव्हे, तर आयोगाने म्हटलेय की, ‘माध्यमांच्या वृत्तानुसार, कोर्टात हजर होण्यापूर्वी दिशाला पसंतीचा वकील उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. अनेक कार्यकर्त्यांनी असा दावाही केला आहे की, अटकेच्या वेळी तिच्या पालकांना तिला कोठे नेले जात आहे, याची माहितीही देण्यात आली नव्हती.
घटनेच्या कलम 22 (1) नुसार अटकेनंतर प्रत्येकाला पसंतीच्या वकिलाद्वारे कायदेशीर बाजू मांडण्याचा अधिकार आहे. याप्रकरणी आतापर्यंत केलेल्या कारवाईबाबत आयोगाने पोलिसांकडून माहिती मागितली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या, ‘शेतकरी आंदोलनाशी संबंधित प्रकरणात दिशाला अटक करण्यात आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार दिशाला कोर्टात हजर करण्यापूर्वी पसंतीचा वकील देण्यात आला नव्हता. एवढेच नव्हे, तर अटकेदरम्यानही कायदेशीर प्रक्रियेचे योग्य प्रकारे पालन झाले नाही. आम्ही पोलिसांना नोटीस बजावली असून या संपूर्ण प्रकरणाची माहिती मागितली आहे.’
महत्वाच्या बातम्या
- दिशा रवी – ग्रेटा थनबर्ग यांच्यातील व्हॉट्सअप चॅट्स, वाचा Toolkit बाबत काय म्हणाल्या दोघी?
- रिहानाने पुन्हा खाल्ली माती, गळ्यात गणपतीचं पेंडंट घालून पोस्ट केला टॉपलेस फोटो
- BMCचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच, भाजपची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- 15 व्या वर्षात घराबाहेर काढलेल्या कंगनाला नेटकऱ्यांनी केले पुन्हा ट्रोल


