Share

BMCचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच, भाजपची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात बीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करणाऱ्या भाजपला आज मोठा धक्का बसला. पक्षाचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. राज्य सरकारमधील कॉंग्रेस ही शिवसेनेची सहयोगी असल्याचे शिंदे म्हणाले होते. त्यामुळे महापालिकेमध्ये कॉंग्रेस विरोधी पक्षनेतेपदी राहू शकत नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता.

2017 मध्ये बीएमसी निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भाजप हे राज्यातील सत्तेत एकमेकांचे मित्रपक्ष होते. भाजपनेही बीएमसीमध्ये सेनेला साथ दिली. निवडणुकीनंतर शिवसेनेला बीएमसीची सत्ता मिळाली आणि त्यांचा महापौर झाला, तेव्हा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा भाजपने केला नव्हता. यामुळे 82 जागा जिंकणाऱ्या भाजपच्या ऐवजी केवळ 31 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद आले.

आता राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे. भाजपने म्हटले की, राज्यातील सत्तेत शिवसेनेची भागीदार असलेली कॉंग्रेस महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळू शकत नाही. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. तेव्हा हायकोर्टानेही म्हटले होते की, एकदा पदाचा दावा सोडल्यावर दुसऱ्यांदा त्यांचा दावा विचारात घेता येणार नाही.

भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर युक्तिवाद केला. परिस्थिती समजून न घेता उच्च न्यायालयानं आपली याचिका फेटाळल्याचं ते म्हणाले होते. रोहतगी यांचे प्रारंभीचे युक्तिवाद ऐकून सुप्रीम कोर्टाने 21 जानेवारीला यावर विचार करण्याचे म्हटले होते. परंतु आज हायकोर्टाच्या निर्णयाला योग्य ठरवत शिंदे यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!