Share

‘राहुल गांधी दम असेल तर गुजरातेतून निवडणूक लढवून दाखवा!’

Published On: 

🕒 1 min read

नवसारी : गुजरातेत सध्या कोरोनाव्यतिरिक्त निवडणुकांचाही ज्वर आहे. येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि कॉंग्रेसने सर्व शक्ती पणाला लावली आहे. एवढेच नाही, येथे ओवैसींचा पक्ष एआयएमआयएम आणि आम आदमी पार्टीही नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते या निवडणुका म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांचेच प्रतिबिंब असणार आहेत. म्हणूनच प्रत्येक पक्षासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक झाली आहे. गुजरातमधील 6 महापालिकांची निवडणूक 21 तारखेला होणार आहे. भाजपने प्रचारासाठी आपली स्टार टीम पाठवली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज नवसारी येथे प्रचारादरम्यान काँग्रेस व राहुल गांधींवर घणाघाती टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. आसाममधील ‘चहाच्या बागांबद्दल’ राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. स्मृती इराणी म्हणाल्या, ‘कॉंग्रेसला गुजरातचा आणि गुजरातींचाही त्रास वाटतो, मी राहुल गांधींना आव्हान देते की, दम असेल तर गुजरातेतून निवडणूक लढवून दाखवा.’

राहुल गांधींनी आसाममधील चहाच्या बागेत काम करणाऱ्या मजुरांविषयी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना स्मृती इराणी म्हणाल्या की, ‘राहुल गांधींनी गुजरातमधून निवडणूक लढविल्यास ‘चाय का चाय और पानी का पानी हो जाएगा.’

तथापि, मोदी सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले होते की, आसाममधील मजुरांना 167 रुपये मिळतात आणि चहाची बाग गुजरातच्या उद्योजकांना दिली जाते. त्यांना माहिती आहे की, केवळ आसाम तोडूनच ते येथून चोरी करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!