Share

15 व्या वर्षात घराबाहेर काढलेल्या कंगनाला नेटकऱ्यांनी केले पुन्हा ट्रोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत कोणालाही लक्ष्य करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. कंगना नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलेब्रिटीपर्यंत सर्वांनाच वेठीस धरते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि राज्य सरकार यांच्यात झालेला वाद हा चांगलाच पेटला होता. कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त  ट्वीटमुळे  कायम चर्चेत असते.

बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडी यावर ती आपल्या रोखठोक प्रतिक्रिया देते. परंतु सतत व्यक्त होण्याच्या या प्रवृत्तीमुळं तिला अनेकदा ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी कंगनानं आपल्या बालपणीचा किस्सा सांगितला. वडिलांनी 15 व्या वर्षी  तिला घराबाहेर काढलं होतं. मात्र हा किस्सा ऐकून अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे.

‘मी वयाच्या 15 व्या वर्षी घरं सोडलं होतं. वडिलांनी मला मदत करायला देखील नकार दिला होता. तेव्हापासून मी आत्मनिर्भर आयुष्य जगले आहे. 16 व्या वर्षी एका अंडरवर्ल्ड माफियानं मला पकडलं होतं. पण 21 वर्षी मी एक यशस्वी अभिनेत्री म्हणून उदयास आले होते. मला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. वांद्रे येथील एका उच्चभ्रू वस्तीत मी माझं घर विकत घेतलं होतं. ‘अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मात्र हे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे.

यावर नेटकरी म्हणाले, कंगना तू अर्धवट माहिती देत आहेस. तू नक्कीच काही तरी मोठ्या चूका केल्या असणार त्यामुळे वडिलांनी तुला मदत करण्यास नकार दिला. कुठलेही पालक आपल्या मुलांना असं वाऱ्यावर सोडून देत नाहीत. अशा आशयाचे ट्विट्स करुन नेटकरी कंगनाची खिल्ली उडवत आहेत. कंगनाचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत बऱ्याच नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/JigraaJat/status/1361255859926499331?s=20

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!