🕒 1 min read
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी गडावरील पुतळ्याच्या अनावरणावरून निर्माण झालेला वाद सुरूच असल्याचे चित्र आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर सडकून टीका केली होती. शरद पवारांसारख्या वाईट प्रवृत्तीद्वारे अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण हा अपमान आहे, अशी जळजळीत टीका केली होती. तसेच, शरद पवारांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होण्याआधीच पडळकरांनी कार्यकर्त्यांसह जेजूरी गडावर पोहचत पुतळ्याचे अनावरण केले होते.
रोहित पवार जामखेड तालुक्यातून जिथून आमदार म्हणून जातात, त्या मतदारसंघात चौंडीला अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पुतळ्याचे अनावरणा दरम्यान केले होते. आता शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याचा माजी मंत्री राम शिंदे यांनी आक्षेप घेतला असून नातवाच्या प्रेमा पोटी अहिल्यादेवी होळकरापेक्षा नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ कसा काय असू शकतो असा सवाल करत अहिल्यादेवीचा अवमान झाल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधला असून, ते आपला वापर फक्त राजकारण आणि फक्त राजाकारणासाठीच करतात, अशी टीका केली आहे.पडळकरांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. एक व्हिडीओ शेअर करत पडळकरांनी पवारांवर टीका केली आहे.
स्वयंघोषित ‘जाणता राजा' उर्फ मा.शरदचंद्र पवार साहेबांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावलाय… त्यांनी चक्क त्यांचे 'लाडके' रोहित पवार यांच्या मतदार संघात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, असे विधान काल 'जेजूरी गडा'वरून केले. pic.twitter.com/oJoZvc8Xed
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) February 15, 2021
राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांच्या टीकेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राजकीय कारकीर्द पन्नास वर्षे पूर्ण करणाऱ्या शरद पवारसाहेबांवर हेतू पुरस्कृत टीका दिशाहीन झालेले लोक करत आहेत. जेजुरी येथे झालेल्या कार्यक्रमात पवारसाहेबांनी जे वक्तव्य केलं, त्याचा चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जात असल्याचं लंके यांनी म्हटलंय. तर देशाचे नेतृत्व करत असताना त्यांच्याइतका राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक अभ्यास कोणाचाही नाही. जे त्यांच्यावर टीका करतात त्यांची वैचारिक पातळी घसरली आहे, अशी टीका लंके यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पूजा चव्हाणची हत्त्या झाली, त्यासाठी ठाकरे सरकारचे मंत्री जबाबदार’
- ‘माझा नवराच सर्वांना ट्रोल करत आहे’, अश्विनच्या उत्कृष्ठ खेळीनंतर बायकोचं धमाकेदार ट्विट
- ‘केवळ राजीनामा पुरेसा नाही संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी’
- लसीकरणाचा दुसरा डोस घेणाऱ्यांचा थंड प्रतिसाद
- खासदार कराड यांच्या राज्यसभेतील प्रश्नाला रेल्वेमंत्र्यानी ठोस उत्तर देणे टाळले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
