🕒 1 min read
पंढरपूर : आज वसंतपंचमी म्हणजे वसंत महिना सुरु झाल्याची चाहूल निसर्गाचा एक उत्सव, सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. याच मुहूर्तावर साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न होत असतो. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे.

या पार्श्वभूमीवर गाभाऱ्यात तसेच सभामंडप. नामदेव पायरी व मंदिरात सुंदर व आकर्षक नयनरम्य अशी रंगबेरंगी फुलाची आरास करण्यात आली आहे.साक्षात देवाचा विवाह असल्याने याला उपस्थित राहण्यासाठी शेकडोच्या संख्येने भाविक येत असतात मात्र कोरोनामुळे यंदा भाविक नाहीत.

यावेळी आज सकाळी 10 वाजता भागवताचार्य अनुराधा शेटे या रुक्मिणी स्वयंवरची कथा सांगितली. पावणे अकरा वाजता देवाला पंचपक्वानाचा महानैवेद्यानंतर. साडे अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणी या वधू वर यांना विवाहाचा पोशाख परिधान झाले.

त्यांनतर बरोबर 12 वाजता रुक्मिणी स्वयंवर पार पाडला. यावेळी विठ्ठल रुक्मिणीच्या उत्सव मूर्ती सजवलेल्या विवाह मंडपात आणल्या गेल्या आणि हा नयनरम्य असा देवांचा विवाह सोहळा पार पडला. यानंतर लग्नाच्या भोजनावळी सुरू होतील.

महत्वाच्या बातम्या
- ‘दिशा सालियन प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मुलाला वाचवलं’
- वादग्रस्त प्रायव्ह्सी पॉलिसीनंतर व्हॉट्सऍपचे भन्नाट फिचर येणार
- संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
- राम मंदिरासाठी देणग्या न देणाऱ्यांची नावे आरएसएस गोळा करत आहे ?
- गणेश जंयतीच्या शुभमुहूर्तावर बाप्पा सुवर्ण सिंहासनावर आरुढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
