🕒 1 min read
मुंबई : गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले आहेत. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणात भाजपकडून मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या टेप्स बाराखडी पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
त्यानंतर आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं होतं, विरोधी पाक्ष भाजप कडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती या पार्श्वभूमीवर अखेर संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे, टीव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते निलेश राणे यांनी राठोड यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ‘राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता. पण आता इथून पुढे चौकशी कशी होणार? याकडे विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे. राठोड यांच्यावर गुन्हाही दाखल व्हावा, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली. वनमंत्र्यांनी राजीनामा दिला मात्र तो राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारणार का, हे ही पाहावं लागेल, असंही निलेश राणे म्हणाले.’
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मातोश्रीवर आज शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे, तत्पूर्वी संजय राठोड यांनी हा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेत एक मोठा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभं असल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एमएस धोनी चित्रपटात सुशांत सोबत काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्याने संपवलं जीवन
- तरूण उद्योजक बेपत्ता; घरी सोडली आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी
- भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वृध्द ठार; बायपासवरील निशांत पार्कसमोरील घटना
- मागितले होते काय अन मिळाले काय? आकृतीबंधावरुन औरंगाबाद पालिकेची घोर निराशा
- टूलकिट प्रकरणाचे महाराष्ट्रात देखील धागेदोरे; बीडमधला संशयित फरार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
