Share

तामिळनाडू, राजस्थानच्या धर्तीवर मराठा समाजाला वेगळा न्याय ही भूमिका पटली नाही : अशोक चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील साष्टी पिंपळगाव येथे आंदोलन आणि उपोषण सुरू आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि पालकमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला. तामिळनाडू, राजस्थान, हरियाणामध्ये ५० टक्क्यांच्या पुढे जाऊन आरक्षण देण्यात आलेले आहे. असे असताना मराठा समाजाला हा निकष का नाही? इतरांना वेगळा आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, ही भूमिका पटलेली नाही, अशी भूमिका यावेळी अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यासाठी राज्य सरकारने उत्तम वकीलांची नियुक्ती केली आहे. ही लढाई आपण नक्की जिंकू, असा विश्वास देखील यावेळी चव्हाण यांनी आंदोलकांना दिला.

विजय वडेट्टीवार यांना सल्ला

दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जालना येथील ओबीसी मोर्चाच्या वेळी भाषणात आमच्या आरक्षणात कुणी घुसल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने साष्टपिंपळगाव आंदोलनाच्या वतीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर बोलताना, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जर सरकारमध्ये मंत्री असलेल्या एखाद्या जबाबदार व्यक्तीने आक्षेपार्ह विधान केले असेल तर ते योग्य नाही, असे चव्हाण म्हणाले.

विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर

यावेळी विरोधकांच्या टिकेलाही अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. मराठा आरक्षणात कुणी पक्षीय राजकारण करू नये, हा विषय कुण्या एका पक्षाचा नव्हे तर समाजाचा आहे, मराठा आरक्षणप्रश्नी सरकार काही करीत नाही हा विरोधकांचा आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे म्हणत चव्हाण यांनी आतापर्यंत तुम्ही तरी काय केलं, असा सवाल विरोधकांना केला. तुम्ही-आम्ही करण्यापेक्षा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण मिळून ही लढाई लढू, असे यावेळी चव्हाण चव्हाण म्हणाले.

आंदोलक आंदोलनावर ठाम

मंत्री अशोक चव्हाण यांनी साष्टपिंपळगावातील आंदोलन करणाऱ्या माता व भगिनींनी आपले आंदोलन मागे घ्यावे, शिष्टमंडळाने मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, असे आवाहन केले. मात्र, युवती व महिला आंदोलकांनी समाजातील मुला-मुलींना न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!