🕒 1 min read
नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मागील दोन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला आहे. शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहे. दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनात आतापर्यंत झालेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू हा त्यांच्या इच्छेनुसारच झाला आहे, असं हीन दर्जाचं वक्तव्य करत शेतकरी त्यांच्या घरी असते तरी ते मेलेच असते ना, असं अपमानजनक वक्तव्य हरयाणाचे कृषीमंत्री जे.पी. दलाल यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु असताना काही शेतकरी धारातिर्थी पडले. मात्र त्यांचा अपमान करत शेतकरी आंदोलनाची खिल्ली हरयाणाचे कृषिमंत्र्यांनी उडवली आहे. शेतकरी आंदोलनात बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, अशा बातम्या सातत्याने येत आहेत. पण मला वाटतं संबंधित शेतकरी त्यांच्या घरी असते तरी त्यांचा मृत्यू झालाच असता. त्यांचा मृत्यू त्यांच्या इच्छेनुसारच झाला आहे, असं ते म्हणाले.
दलाल यांनी शेतकरी आंदोलनावर अपमानजनक टिप्पणी केल्यानंतर देशभरातील शेतकरी नेत्यांनी तसंच चळवळीतील प्रमुख नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. सर्वत्र निषेधाचा सूर निघाल्याने माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणत दलाल यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ToolKit प्रकरणातील निकिता जेकब आणि शांतनु कोण? काय होता त्यांचा प्लॅन? जाणून घ्या…
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट
- पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या ‘या’ भाजप आमदाराला येताहेत धमकीचे फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
