🕒 1 min read
अहमदाबाद : कोरोनाची वाढत्या केसेसमुळे 16 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत गुजरातच्या चार शहरांमध्ये पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या शहरांमध्ये अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि राजकोटचा समावेश आहे. तथापि, रात्रीच्या कर्फ्यूची वेळ एक तासाने कमी करण्यात आली आहे, म्हणजेच आता रात्री 12 ते सकाळी 6.00 अशी वेळ कर्फ्यूची असणार आहे.
गुजरातेत मागच्या 24 तासांत कोरोनाचे 247 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, राज्यात आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या वाढून 2,65,244 झाली आहे. त्याच वेळी मृतांची संख्या वाढून 4401 झाली. तत्पूर्वी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. रविवारी वडोदराच्या निजामपुरा भागात आगामी महापालिका निवडणुकांच्या प्रचार सभेला संबोधित करताना विजय रुपाणी स्टेजवर बेशुद्ध झाले आणि त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथे नेण्यात आले. तेथील यूएन मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात सक्रिय रुग्णांमध्ये वाढ
देशात कोरोना विषाणूच्या सक्रिय प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत नोंदवलेले संक्रमित रुग्ण बरे झालेल्या प्रकरणांपेक्षा जास्त आहेत. गेल्या 24 तासांत 11,649 नवे संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर 9,489 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यादरम्यान 87 मृत्यूंची नोंद झाली आहे. यावरून देशात सक्रिय रुग्णांची संख्या 2073 ने वाढल्याचे दिसून येते. मागच्या काही दिवसांपासून नवीन रुग्णांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी होती, ज्यामुळे सक्रिय केसेसदेखील सतत कमी होत होत्या. परंतु मागच्या 24 तासांत डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या कमी आढळल्याने एका दिवसात दोन हजारांहून अधिक सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती.
महाराष्ट्रातही वाढतेय रुग्णसंख्या
महाराष्ट्रातही कोरोना विषाणूच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. दोन दिवसांत कोरोनाच्या केसेसमध्ये पाच पट वाढ झाली आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच कोरोनासंदर्भात पुन्हा कडक निर्देश दिले आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ToolKit प्रकरणातील निकिता जेकब आणि शांतनु कोण? काय होता त्यांचा प्लॅन? जाणून घ्या…
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट
- पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या ‘या’ भाजप आमदाराला येताहेत धमकीचे फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
