Share

‘वो नही करेंगे तो हम करके दिखायेंगे’, सरदार वल्लभभाईंच्या पुतळ्यावरून काँग्रेसचा शिवसेनेला इशारा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरातील शहागंजमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार होते. परंतु ऐनवेळी अनावरण पुढे ढकलण्यात आले. मनपा निवडणुकीच्या दृष्टीने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शहागंज मध्ये आणून त्यांच्या हस्ते अनावरण करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. ‘गेली ५ वर्षे पुतळ्याचे काम संथगतीने चालले आता आनावरणातही शिवसेना राजकारण करु इच्छित असेल तर आम्ही देखील मागे हटणार नाही, वो नही करेंगे तो हम करके दिखायेंगे’ अशा शब्दांत काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी शिवसेनेवर तोफ डागली.

‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना उस्मानी पुढे म्हणाले, ‘ १९६० मध्ये काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचा अर्धाकृती पुतळा सर्वप्रथम बसवला होता. पूर्णाकृती पुतळ्यासाठी मनपाने १०-१२ वर्षे घेतली. आज जर पुतळा पूर्णपणे तयार आहे तर कशासाठी आणि कोणासाठी वाट बघितली जात आहे. यापाठीमागे कोणाचा हात आहे? मनपा आयुक्तांना आम्ही वारंवार याबाबत सांगितले आहे त्यांना याआधी अनेक संधी देऊन झाल्या आहेत. जर महापुरुषांचा असा अपमान होणार असेल आणि सरदार वल्लभभाई यांच्या पुतळ्यायाबाबत शिवसेना घाणेरडे राजकारण करू इच्छित असेल तर पुतळ्याचे अनावरण करायला आम्ही सुद्धा तयार आहोत’, असा इशाराच त्यांनी दिला.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ७ नोव्हेंबर २००९ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव घेतला होता. या ठरावानुसार शाहगंज चमन येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अस्तित्वात असलेला अर्धाकृती पुतळयाऐवजी याठिकाणी पूर्णकृती पुतळा उभारण्याचे ठरले. यासंदर्भात महानगरपालिकेने एकूण १९ लाख ९४ हजार रुपयाचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यानुसार सरदार पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच सदर पुतळ्याचे परिसर सुशोभीकरण करण्यासाठी तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या खासदार निधीतून एकूण ४० लक्ष रुपये निधी मंजूर केला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!