Share

गुजरातचे CM विजय रुपाणी यांना कोरोनाची लागण, कालच भाषणावेळी पडले होते बेशुद्ध

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. रविवारी सायंकाळी एका सभेला संबोधित करत असताना ते अचानक बेशुद्ध पडले होते. यानंतर त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे रुपाणींव्यतिरिक्त कच्छचे खासदार विनोद चावडा आणि गुजरात भाजप संघटनेचे सरचिटणीस भिखूभाई दलसानिया हेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. काही दिवसांपूर्वी उमेदवारांच्या निवडीसाठी राज्य संसदीय मंडळाची बैठक घेण्यात आली होती. यात सीएम विजय रुपाणी यांच्यासमवेत मंडळाच्या इतर सदस्यांनी भाग घेतला. यात गुजरातचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. आता गुजरात भाजपच्या सर्व संसदीय मंडळाच्या सदस्यांना चाचण्या करण्यास सांगण्यात आले आहे.

वडोदराच्या निजामपुरा भागात रविवारी झालेल्या सभेला संबोधित करताना रुपाणी व्यासपीठावर अचानक बेशुद्ध होऊन कोसळले होते. कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वी रुग्णालयाचे डॉ. आरके पटेल यांनी पत्रकारांना सांगितले की, “थकवा आणि पाण्याअभावी रुपाणी बेशुद्ध पडले. त्यांच्या इतरही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून त्या सामान्य आल्या आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी फोनवरून विजय रुपाणी यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. रुपाणी ज्या सभेत बेशुद्ध झाले, ती त्यांची एका दिवसातील तिसरी सभा होती. वडोदरासह सहा महानगरपालिकांच्या निवडणुका २१ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. या महापालिकांचा निकाल 23 फेब्रुवारी रोजी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!