Share

‘पूजा चव्हाण यांच्या वडिलांचे स्टेटमेंट अतिशय दुर्दैवी’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : “पूजा चव्हाणच्या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अजून कोणालाही अटक झालेली नाही. पूजा चव्हाणच्या वडिलांनी दिलेले स्टेटमेंट हे अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणात जी मुलं साक्षीदार होती त्यांना सुरुवातीला सोडण्यात आलं. आता त्यांचा शोध घेतला जातोय,” असे चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, गृहराज्यमंत्री संजय राठोड यांचं संरक्षण करतायत का?, असा खोचक सवालही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारला केला.

या प्रकरणात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अजून कोणालाही अटक झालेली नाही. पूजा चव्हाणच्या वडिलांनी दिलेले स्टेटमेंट हे अतिशय दुर्दैवी आहे. असे म्हणत चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यू नंतर  पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी काल माध्यमांना प्रथमच प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आम्हाला बदनाम करु नका. तिला कर्जाचे टेन्शन आले असावे, असे वक्तव्य केले. याच वक्तव्यावर, तसेच पोलिसांच्या भूमिकेवर बोलताना चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. त्या मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या.

यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमधील आवाज संजय राठोड यांचाचा आहे, असा दावा त्यांनी केला. “प्रशासनाला एक मंत्री सापडत नाहीये. संपूर्ण राज्यासाठी हे दुर्दैवी आहे. या सगळ्या गोष्टी खूप संशयास्पद आहेत. संजय राठोड यांची गच्छंती व्हायला हवी. पोलिसांनी या प्रकरणी तपास करायला हवा,” असे त्या म्हणाल्या. तसेच, मुख्यमंत्र्यांनी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स नीट ऐकल्या नसतील तर त्यांनी त्या नीट ऐकायला हव्यात, असा खोचक टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!