Share

भाजप नेत्यांच्या दौऱ्याला गैरहजर राहणारे संजयकाका जयंत पाटलांच्या शेजारी बसतात तेव्हा…

Published On: 

🕒 1 min read

सांगली : पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सद्याचे सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील हे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या ‘माझी शाळा आदर्श शाळा अभियान’ कार्यक्रमाच्या प्रसंगी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते.

संजयकाका पाटील हे भाजपमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे. यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले असता, जयंत पाटील यांनी आग्रहाने संजयकाकांना शेजारी बसवून घेतलं. यानंतर उपस्थितांमध्ये तर्क-वितर्कांना सुरुवात झाली होती. कारण, भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या दौऱ्यात खासदार संजयकाका गैरहजर राहिल्याचे दिसून आलं होतं.

संजयकाका हे जयंत पाटील यांच्या जवळचे मानले जातात. ते दिवंगत आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाचं काम करत होते. मात्र, आबांच्यासोबत पक्षांतर्गत वाद असल्याने त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ व २०१९लोकसभा निवडणुकांमध्ये मध्ये संजयकाकांनी भाजपकडून निवडणूक लढवत विजय मिळवला होता.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सांगलीचं पालकमंत्रीपद जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं. संजयकाका हे जयंत पाटील यांच्या दौऱ्यात आवर्जून उपस्थित राहत असल्याचं दिसून आलं आहे. एवढंच नाही तर, आजच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी त्यांना बोलावून आग्रहाने जवळ बसवले. संजयकाका नको नको म्हणत असताना, जयंत पाटलांनी त्यांना जवळ बसवून घेतले. त्यानंतर दोघांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा रंगली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!