Share

वार्षिक नियोजन आराखडा ३५० कोटींपर्यंत वाढवा, आ.पाटलांचे अजित पवारांना साकडे

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार हे जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यासंबंधी औरंगाबादेत बैठक घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा वार्षिक नियोजन आराखड्यात ३५० कोटी रुपयांपर्यंत वाढ करुन महत्त्वाच्या विकास कामांसाठी आगामी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे.

याबाबत वित्तमंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांमध्ये जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी सोलापूर- तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, टेक्निकल टेक्सटाइल हब, नळदुर्ग ग्रामीण रुग्णालय, मराठवाडा वॉटर ग्रीड, तेरणा व तुळजाभवानी साखर कारखान्याकडील थकहमी, उस्मानाबादी शेळी व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा बनविणे या बाबी सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात अंतर्भूत करुन निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याची बलस्थाने असलेल्या विकासकामांसाठी सन २०२१-२२ च्या वार्षिक नियोजन आराखड्यासह अर्थसंकल्पातही भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी अजित पवार यांना निवेदन दिल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!