🕒 1 min read
मुंबई: सध्या अनेक ऐतिहासिक चरित्रांवर सिनेमा बनवण्यावर भर दिला जात आहे. या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते तानाजी मालुसरे, हिरकणी, यांसारखे सिनेमांचा उल्लेख करता येईल. तर आता पुन्हा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आणखी एक असाच ऐतिहासिक चित्रपट मिळाला आहे. छत्रपती ताराराणी असं या चित्रपटाचं नाव आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी ताराबाई यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे.
नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सोनाली कुलकर्णी यामध्ये महाराणी ताराराणी यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे पोस्टर यासंदर्भात अधिक बोलक आहे. घोड्यावर बसलेल्या आक्रमक ताराराणींच्या भूमिकेत सोनालीला दाखवण्यात आलं आहे.
https://www.instagram.com/p/CLTKCCpF0Nc/?utm_source=ig_web_copy_link
प्रसिद्ध लेखक जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या पुस्तकावर आधारित हा सिनेमा असणार आहे. राहुल जनार्दन जाधव या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अवधूत गुप्तेचं संगीत तर कथा, पटकथा, संवाद डॉ. सुधीर निकम लिहिणार आहेत.
छत्रपती ताराराणींचं प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर आणण्याचं भाग्य लाभणं म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याच बरोबरीने आजवर ज्या रणरागिणी विषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात फार काही केलं गेलं नाही, तिच्या कर्तुत्वाचे पोवाडे गाणं हे अत्यंत आव्हानात्मक काम असेल, या जबाबदारीची जाणिवही मला आहे. महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो, आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचं बळ भरावं बास हीच प्रार्थना, असं सोनालीनं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- पहिल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे निधन
- एमसीएच विंगला मिळणार हिरवा कंदिल..? वैद्यकीय शिक्षणमंत्री आज घाटीत
- ‘२२ वर्षीय विद्यार्थिनी देशासाठी धोका असेल तर देश कमकुवत मुल्यांवर उभा आहे.’
- उदगीरच्या पोलीस अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
