Share

कोणी काहीही बोलू द्या, मी संयमाने जनतेची कामे करतो-आ.संदिप क्षीरसागर

Published On: 

🕒 1 min read

बीड :  बीड तालुक्यातील बोरफडी आणि परिसरातील जनतेने कायम आमच्यावर प्रेम केल आहे. सर्व साधारण माणसाने सोबत राहत साथ दिली. निवडणुकीच्या विजयानंतर कोरोनाचे संकट ओढावलं त्यामुळे भेटता आलं नाही. या संकट काळातही आपण सामान्य माणसांना आधार देण्यासाठी प्रयत्नशील राहिलोत, कोण काय बोलतं काय टीका करतं यापेक्षा आपण आपला संयम तुटु न देता लोकांची, जनतेची कामे करत आहोत. रखडलेली विकास कामे पुर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध असून बोरफडी व परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार संदिप क्षीरसागर यांनी दिली.

बोरफडी-मोहगीरवाडी-लक्ष्मीनगर या रस्त्याचे दोन कोटी ३३ लाख रूपये निधीतून काम होत असून या कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनिल धांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते डी.बी.बागल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बागल म्हणाले की, गेल्या ३० वर्षाच्या काळात जो विकास झाला नाही ती विकास कामे पुर्ण करण्यासाठी आमदार संदिप क्षीरसागर निश्चित प्रयत्नशिल आहेत. कोरोनाचं संकट असतांनाही त्यांनी सामान्य माणसाला मदत करत विविध योजनांच्या माध्यमातून त्यांनी शासनाचा निधी बीड मतदार संघात खेचून आणला आहे.

माजी सय्यद सलीम म्हणाले की, या रस्त्याच्या कामामुळे मोठा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढेही या भागातील आणि मतदार संघातील मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. माजी आमदार सुनील धांडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे साळवे, वीर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच हनुमंत कुटे, लालासाहेब घुगे, गोपीनाथ घुगे, नंदु कदम, नितीन कुटे, बिभीषण घुगे, श्रीमंत पनाळे, विक्रम कुटे, कांता जाधव व बोरफडी, मोहगीरवाडी येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!