🕒 1 min read
नवी दिल्ली : पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली होती. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं आहे. दरम्यान, या आंदोलनाला जागतिक पातळीवर समर्थन देण्यासाठी तयार केलेल्या नियोजनाचे गुगल डॉक्युमेंट्स ग्रेटाने ट्विटरवरून शेअर केले होते आणि नंतर ते डिलीट देखील केले होत.
यामध्ये डॉक्यूमेंटचे टायटल ‘ग्लोबल फार्मर्स स्ट्राईक-फर्स्ट वेव्ह’ असे आहे. भारतीय दूतावासासमोर आंदोलन करा, तसेच अदानी आणि अंबानी यांच्या ऑफिससमोर आंदोलन करा. २६ जानेवारी हा एकत्रितपणे जागतिक स्तरावर आंदोलन करण्याचा दिवस आहे. आपण जेथे असाल तेथे स्थानिक ठिकाणी आपले समर्थन दाखवा. आपल्या शहरात, राज्यात, देशात निषेध होत असल्याचे शोधा आणि सहभागी व्हा. यासह स्वतः एखादे आयोजन करा, असे या डॉक्युमेंट्समध्ये म्हटले होते.
दरम्यान, या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटने बेंगळुरुतील 21 वर्षीय क्लायमेट अ;ॅक्टिव्हिस्ट दिशा रविला अटक केली आहे. या प्रकरणातील भारतातील ही पहिली अटक आहे. दिशाच्या अटकेनंतर आता राजकारण तापायला सुरुवात झाली असून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि शशी थरूर यांनी देखील आता दिशाच्या अटकेचा विरोध केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. “एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरत आहेत” अशी घणाघाती टीका प्रियंका यांनी केली आहे. “डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से, फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से” अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी दिशा रवीच्या अटकेचा निषेध केला आहे. अटकेवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच ReleaseDishaRavi, DishaRavi IndiaBeingSilenced हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
डरते हैं बंदूकों वाले एक निहत्थी लड़की से
फैले हैं हिम्मत के उजाले एक निहत्थी लड़की से#ReleaseDishaRavi #DishaRavi#IndiaBeingSilenced— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 15, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- आजपासून फास्ट टॅग नसेल तर डबल टोल भरावा लागणार
- सर्वसामान्य मुली यापुढे पुढाऱ्यांनी केलेल्या अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्याची हिम्मत करतील का ?
- ‘२२ वर्षीय विद्यार्थिनी देशासाठी धोका असेल तर देश कमकुवत मुल्यांवर उभा आहे.’
- मोठी बातमी: गृहिणींच बजेट कोलमडणार; घरगुती एलपीजी सिलेंडरची दरवाढ
- तिसऱ्या कसोटीत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार, तिकीट विक्रीला सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
