Share

पूजा चव्हाण प्रकरणात तपास करणारे पोलीसच दबावात आहेत ?

Published On: 

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. नुकतीच तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपली जीवनज्योत विझवली.

ही आत्महत्या आहे की तिला कोणी मारलं ? असा प्रश्न भाजपा महिला आघाडीने उपस्थित करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं आहे. या २२ वर्षीय तरूणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व घटनाक्रमावर भाष्य केले आहे. ‘या प्रकरणी व्यवस्थित चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. त्यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई होईल’, असं त्यांनी सांगितलं आहे. ‘गेले काही दिवस काही महिने काही वेळेला आपलं असं लक्षात आलेलं आहे. आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. तर असाही प्रयत्न होता कामा नये व याचबरोबर सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशीतून जनतेसमोर येईल’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान,पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड तपास करत आहेत. याप्रकरणात अद्याप तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. याप्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

दरम्यान,पूजा चव्हाण यांचे कुटुंबीय दबावात असल्याची चर्चा सुरु असताना आता या प्रकरणात पोलीस दबावात असल्याचा संशय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात असून गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण पोलीस तपासात प्रगती दिसत नाही. यामुळे पोलीस दबावात आहेत का, याप्रकरणी सत्य समोर आले पाहिजे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

या प्रकरणातील ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पोलिसांनीही ते सांगण्याची गरज आहे. पण पोलिसांकडून तथ्य लपवले जात आहे. या प्रकरणात पोलीस दबावात आहेत हे स्पष्ट दिसते. याप्रकरणी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तपास पुढे सरकणार नाही. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.लोकसत्ताने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!