Share

बेरोजगार तरुणांना बिझनेस सुरू करायचा असेल तर सोनू सूद करणार मदत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य केले. अशीच मदतीचा हात अभिनेता सोनू सूदने पुढे केला. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनपासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सामान्य नागरिकांमध्ये चांगला प्रसिद्ध झाला. त्याने या जीवघेण्या काळात अनेकांना मदत केली. सोनूने लोकांना मदत करण्यासाठी आणखी एक उत्तम पर्याय शोधून काढला आहे. सोनू सूदने परदेशात काम करमाऱ्या मजुरांना आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. बॉलिवूडचा हा पॉप्यूलर स्टार सगळ्यांच्याच मदतीला धावून जात असतो. आताही त्याने असंच अनोखं काम केलं आहे. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांनाही आता सोनू सूद मदत करणार आहे.

खरंतर, सोनू सूदने बेरोजगार तरुणांसाठी एक नवीन योजना आणली आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडे पैसे नसतील असेही लोक आता त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करतील. कारण आर्थिक पाठबळ नसणाऱ्यांना आता सोनू सूद मदत करणार आहे. त्याने स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.

ट्विटरवर त्याने एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘सज्ज व्हा.’ ‘आता झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये स्वतःच बॉस व्हा. तुमच्या गावात स्वतःचा व्यवसाय करा. या नवीन उपक्रमांतर्गत आम्ही गावातील तरुणांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करू.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!