🕒 1 min read
नवी दिल्ली: जवळ जवळ तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं आहे. दरम्यान, या आंदोलनाला जागतिक पातळीवर समर्थन देण्यासाठी तयार केलेल्या नियोजनाचे गुगल डॉक्युमेंट्स ग्रेटाने ट्विटरवरून शेअर केले होते आणि नंतर ते डिलीट देखील केले होत.
यामध्ये डॉक्यूमेंटचे टायटल ‘ग्लोबल फार्मर्स स्ट्राईक-फर्स्ट वेव्ह’ असे आहे. भारतीय दूतावासासमोर आंदोलन करा, तसेच अदानी आणि अंबानी यांच्या ऑफिससमोर आंदोलन करा. २६ जानेवारी हा एकत्रितपणे जागतिक स्तरावर आंदोलन करण्याचा दिवस आहे. आपण जेथे असाल तेथे स्थानिक ठिकाणी आपले समर्थन दाखवा. आपल्या शहरात, राज्यात, देशात निषेध होत असल्याचे शोधा आणि सहभागी व्हा. यासह स्वतः एखादे आयोजन करा, असे या डॉक्युमेंट्समध्ये म्हटले होते.
दरम्यान, या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटने बेंगळुरुतील 21 वर्षीय क्लायमेट अ;ॅक्टिव्हिस्ट दिशा रविला अटक केली आहे. या प्रकरणातील भारतातील ही पहिली अटक आहे. दिशा रवि ही फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनची संस्थापक सदस्य आहे. 4 फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी टूलकिट संदर्भात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. टूल किट प्रकरणातील ही पहिली अटक आहे. दिशाने माउंट कार्मेल कॉलेजमधून बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशनची पदवी संपादन केली आहे. दिशा सध्या गुड माइल्ड कंपनीशी संबंधित आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा तिला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली तेव्हा ती घरून काम करत होती.
यानंतर आता कोन्ग्रेस नेत्यांकडून टीका केली जात आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील दिशा रवी अटक प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. की, ‘पण महिला सक्षमीकरणाच्या युगात आता हे काय होत आहे माननीय सर ? सुशिक्षित, उच्च हवामानाचा हवामान कार्यकर्ता, भविष्यातील उज्ज्वल भविष्यासह # दिशारावी, 22 वर्षांची अल्पवयीन मुलगी, हिला अटक करण्यात आली आहे. 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविले. खूप विचित्र आहे.
…..but in the era of women empowerment, now, what is this happening Hon'ble Sir?Educated, climate activist of highest order, with a bright future ahead environmental #DishaRavi, 22yrs old young girl, has been arrested & sent to 5 days police remand. Very strange, don't you
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) February 15, 2021
‘जे पेत्राचे योग्य आहे ते पौलासाठी योग्य असावेत असे वाटते का? अव्वल पत्रकारांसह बरेच लोक लपून बसले आहेत किंवा कोणतेही आरोपपत्रही आकारले जात नाही. येथे एक मुलगी आहे, जी वातावरण आणि देशासाठी वचनबद्ध असल्याचे दिसते. आशा आहे, इच्छा आणि प्रार्थना करा, ती तशी नाही.’
@YashwantSinha@PawarSpeaks@Prithvrj@OfficeofUT@MamataOfficial@ShashiTharoor@ArvindKejriwal@msisodia@SanjayAzadSin@derekobrienmp@Mayawati@yadavakhilesh@yadavtejashwi@rssurjewala@AnilDeshmukhNCP@advmajeedmemon
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) February 15, 2021
‘मुख्य प्रश्नांकडे लक्ष वळविण्याकरिता केले आणि शेतकर्यांच्या न्याय्य मागण्या? माननीय सी जे महोदय, अशी आशा आहे की आपल्या लोकांवर चांगली भावना असेल आणि / किंवा तिला न्याय लवकरात लवकर मिळेल. जय हिंद!’ असे म्हणत त्यांनी दिशाला पाठींबा आणि सरकारवर टीका केली आह्रे.
महत्वाच्या बातम्या
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- पहिल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे निधन
- एमसीएच विंगला मिळणार हिरवा कंदिल..? वैद्यकीय शिक्षणमंत्री आज घाटीत
- ‘२२ वर्षीय विद्यार्थिनी देशासाठी धोका असेल तर देश कमकुवत मुल्यांवर उभा आहे.’
- उदगीरच्या पोलीस अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
