Share

वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण

Published On: 

जालना : कृषी पंपाची वसुली करण्यासाठी गावात आलेल्या महावितरणच्या लाइनमनच्या अंगावर ऑइल टाकून बेदम मारहाण केल्याची घटना परतूर तालुक्यातील रोहिणा खुर्द येथे घडली आहे. दत्ता भोंगाने असे मारहाण झालेल्या महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे.

परतूर उपविभागात ग्रामीण भागात रोहिणा या गावात कार्यरत महावितरणचे कर्मचारी दत्ता भोंगाने रविवारी सकाळी ८ वाजता गावातील शेतकऱ्यांकडून वीज बिलाची रक्कम भरून घेत होते. या दरम्यान, भगवान पाटोळे आणि नारायण पाटोळे हे दोघे भाऊ त्या ठिकाणी आले. यांना कशाचे बिल द्यायचे असे म्हणत भगवान पाटोळेने सोबत आणलेल्या कॅनमधील काळे ऑइल दत्ता भोंगाने यांच्या अंगावर टाकले आणि नारायण पाटोळेने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर दत्ता भोंगाने यांनी दिलेल्या दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या दोघा भावांविरुद्ध परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणकडून सक्तीने वीज बिल वसूली सुरू
महावितरणकडून सध्या ग्रामीण भागात कृषी पंपाचे वीज बिल वसूली सुरू. यासाठी प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना टार्गेट देण्यात आले आहे. या मोहिमेचा भाग म्हणून महावितरणचे कर्मचारी गावोगावी जाऊन वसुली करत आहेत.

भाजपचा आंदोलनाचा इशारा
भाजपचे आमदार संतोष दानवे यानी राज्य सरकारा आंदोलनचा इशारा दिलाय. आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही. भाजपकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महावितरणच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच वीजपुरवठा खंडित करण्यास येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना भाजप अटकाव करेल असा इशारा संतोष दानवे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!