Share

आज मी जो काही आहे तो शरद पवारांमुळेच – सुशीलकुमार शिंदे

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते शरद पवार आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यातील मैत्री राज्याला माहिती आहे. या दोघांतील मैत्रीच्या आठवणीला आज सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील नान्नज येथे दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंग बेरी द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते

तुम्हाला वाटत असेल की आमच्यात अंतर आहे. मात्र आज त्यांनी दाखवून दिले आहे की आमच्यात कोणतंही अंतर नाही. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी मला सरकारमध्ये घेतलं नाही म्हणून मी शेतीच्या मार्गावर लागलो. आज जवळजवळ 34 एकर माझी शेती आहे. एखाद्याला पुढं रेटायचं, त्याचं गुणगान करायचं यात शरदरावांचा हात कोणी धरु शकत नाही. एखाद्याच्या विषयी त्यांनी मनात घेतलं तर ते पुढे ढकलतात. अशा शब्दांत सुशीलकुमार शिंदेंनी पवारांचे कोतूक केले आहे.

1978 साली आम्ही एकत्र होतो असं सांगत सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, ‘शरदरावांनी मला निवडणुकीला उभं केलं आणि पैसेही दिले. त्यांनी दिलेले 20 हजार रुपये मी परत द्यायला गेलो तेव्हा त्यांनी ते मला परत पाठवले. आज मी जो काही आहे ते शरद पवारांच्यामुळेच’.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!