🕒 1 min read
औरंगाबाद : ज्येष्ठ पत्रकार मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर स्मृति पुरस्काराचे वितरण शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या रूक्मिणी सभागृहात झाले. ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांच्या हस्ते राखी तांबट या विद्यार्थिनीला पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पत्रकारिता क्षेत्रातील महिलेला दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी राखी हीची निवड करण्यात आली. या वेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर अंकुशराव कदम यांनी पुरस्कार समारंभ कसा सुरू झाला, प्रस्ताव समोर आला तेव्हा मंगला विंचूर्णे ह्या गंभीर आजारी होत्या. त्यानंतर दोन वर्षांनी हा पुरस्कार सुरू करण्यात आला असल्याचे सांगितले.
संपादक राजीव खांडेकर यांनी पत्रकारितेत सुरू असलेले बदल, बदलती व्यवस्था यावर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार एमजीएम महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. आशा देशपांडे यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- पूजा चव्हाण प्रकरणी त्या मंत्र्याची एकनाथ शिंदेकडून पाठराखण
- कोहलीच्या निर्णयावर भडकले गावसकर म्हणाले…
- बीड डिसीसी बँकेची १९ जागांसाठी निवडणूक; २० मार्चला होणार मतदान
- सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणार मोठा दिलासा
- बॅड न्यूज : रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
