🕒 1 min read
उस्मानाबाद : नगर पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षांच्या दालनात झाली. यावेळी २०२१- २२ या वर्षीच्या अर्थसंकल्पावर चर्चा झाली. सभेला सुरुवात होताच कोरोनाचे पडसाद दिसून आले. यंदाच्या वर्षात कोरोनामुळे वसुलीची मोहीम थंडावल्याचे चित्र होते. नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली नसली तरी पालिकेला सर्वच सुविधा पुरविताना आर्थिक बोजा असल्याचे दिसून आले. अपेक्षित वसुली झालेली नसल्याचा मुद्दा नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी मांडला. काही नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून घरपट्टी आणि पाणीपट्टी भरीत नसल्याचेही दिसून आले. या वसुलीसाठी वेळप्रसंगी पोलिस प्रशासनाची मदत घ्यावी, असे निर्देश नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकरांनी प्रशासनाला दिले.
कोणतीही करवाढ नसलेल्या आठ लाख ४० हजार रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. नव्याने नळजोडणी देण्याचे दरही कमी करण्यावर सर्वच सदस्यांचे एकमत झाल्याचे दिसून आले. दरम्यान, कोरोनाचा परिणाम कर वसुलीवरही झाला असून, वसुली निम्यावर आली आहे. शिवाय काही करबुडवे वर्षानूवर्षे भरणा करीत नसल्याने त्यांच्या विरोधात वसुलीची मोहीम राबविण्याचे निर्देश नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिले.
काही शासकीय संस्थाही पालिकेची पाणीपट्टी देत नसल्याचा विषय चर्चेत आला. त्यांच्याकडूनही वसुलीची मोहीम राबविण्याचे सर्वानुमते ठरले. शिवाय काही गाळेधारक, पोटभाडेकरू ठेवतात. यामध्ये पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढत नाही. उलट तोटा होत आहे. असे भाडेकरू काढून पालिकेने गाळे ताब्यात घ्यावेत, अशी मागणी शिक्षण सभापती सिद्धेश्वर कोळी यांनी केली. यावर मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान, नवीन नळजोडणीसाठी जास्तीचा दर आकारू नये, अशी मागणी नगराध्यक्षांसह, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, नगरसेवक राजाभाऊ पवार, युवराज नळे, सोमनाथ गुरव, सुरज साळुंके यांनी केली. त्यानुसार वाजवी दराने पाणीजोडणी देण्यावर एकमत झाले.
महत्त्वाच्या बातम्या
- बासरी वादनाने नाट्य परिषदेच्या मासिक सभेस प्रारंभ
- नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्राम विकासाचे प्रशिक्षण
- थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही – एकनाथ शिंदे
- लातुर जिल्हा महाराष्ट्र केसरी साठी सज्ज; ४५ मल्ल निवड चाचणीला हजर
- पूजा चव्हाण प्रकरणात कोणत्याही नेत्याचं नाव नाही, भाजप नेत्यांना खोटं बोलण्याची सवय – मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
