Share

पूजा चव्हाण प्रकरणी त्या मंत्र्याची एकनाथ शिंदेकडून पाठराखण

Published On: 

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या एका मंत्र्यावर आरोप होत आहे. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी सदर घटना दुर्दैवी असून मंत्र्यांच्या सहभागाबाबत अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे बोलणे उचित नाही अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महानगरपालिकेतील विविध विकास कामांचा आढावा घेतला. नगरविकास विभागाच्या विविध योजनांच्या प्रगतीचा अहवाल त्यांनी अधिकाऱ्यांकडून मागवून घेतला. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता मंत्र्यांची पाठराखण केलीय.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर याप्रकरणी आरोप होत आहेत. मध्यंतरी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही एका महिलेने बलात्काराचे आरोप केले होते. त्यावेळी मोठा गदारोळ उठला होता. आताही बीड जिल्ह्यातील एका तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणी सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप होत आहेत. याबाबत शिंदे यांना विचारले असता त्यांनी सदर घटना दुर्दैवी आहे, मात्र यात मंत्र्यांच्या सहभागाबाबत अजून पुरावे हाती आले नाहीत. त्यामुळे काही टिप्पणी करणे योग्य होणार नाही, असे सांगत या विषयाला बगल दिली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!