Share

इंधन दरवाढीला मनपाचा सुखद धक्का ; १० वाहन चार्जिंग स्टेशन उभारणार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : इंधन दरवाढीमुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन वापरत असाल तर तुमच्यासाठी खुषखबर आहे. औरंगाबाद मनपाने शहरात १० नवीन वाहन चार्जिंग स्टेशन उभे करणार आहे. आणि सुरुवातीला तीन महिने या चार्जिंग स्टेशनवर मोफत चार्जिंग सेवा देणार असल्याची माहितीही मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितली आहे.

दोन-तीन वर्षापुर्वी औरंगाबाद शहरात कचऱ्याचा प्रश्न चांगलाच पेटला होता. पण हा प्रश्न काही प्रमाणावर सुटला असे म्हणता येईल. गल्लोगल्ली कचऱ्याच्या गाड्या या दिसत आहेत. जमा केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया ही सुरु झाली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मनपाने पर्यावरणाच्या दृष्टीने शहरात सायकल ट्रक सुरू केले आहेत. सोबतच शहरात रस्त्याचे कामही जोरात सुरु आहे. यात भर म्हणुन प्रदुषणाला आळा बसावा म्हणून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढावा यासाठी शहरात १० वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मोठ्या शहरांप्रमाणेच औरंगाबाद शहरातही इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्राथमिक स्तरावर १० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे करणार असल्याचे मनपाने सांगितले आहे. या संदर्भात टाटा मोटर्स व टाटा पॉवर या कंपनीसोबत महानगरपालिकेची चर्चा केली असल्याचे मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे. या स्टेशनवर सुरुवातिचे तीन महिने चार्जिंग मोफत दिली जाणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले आहे. इंधन दरवाढी च्या पार्श्वभुमीवर शहरवासीयांसाठी ही आंनदाची बाब आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!