🕒 1 min read
मुंबई: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच चर्चेत आणि वादात सापडलेले असतात. त्यांनी पदभार स्वीकारल्या पासून ते वादात आहेत. यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा असो की, सरकारचा एखादा निर्णय त्याचबरोबर महाआघाडी सरकार आणि भाजप मधील टीका टिप्पणी मध्ये देखील कोशारी यांचा समावेश असतोच यावरून आजच्या सामना अग्रलेखातून राज्यापालांवर टीका करण्यात आली आहे.
संघाच्या विचारसरणीचे असलेले कोशारी आणि महाआघाडी सरकार हे समीकरणच वेळोवेळी राजभवन आणि सरकार यांच्या वादात नेहमीच अधोरेखित होते. नुकताच राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं होत. आश्चर्य म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली होती. राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार यांच्यातील हा वाद पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. यावरून भाजप कडून राज्य सरकारवर खडसावून टीका केली, राज्यपालांना विमान नाकारणे हा इतिहातील काळा दिवस असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावरून आजच्या सामना अग्रलेखातून भाजपल प्रतिउत्तर देण्यात आले आहे.
‘राज्यपालांनी सरकारच्या अजेंड्यावर चालायचे असते, विरोधी पक्षाच्या नाही. हे संकेत महाराष्ट्रात पायदळी तुडवले जाणे हाच काळा दिवस मानायला हवा. काळा दिवस पाळून निषेध करावा अशा अनेक घटना महाराष्ट्रात व देशात घडल्या असताना महाराष्ट्रातील भाजप चूप बसला. बेळगावातील मराठी माणसावरील अत्याचारावर काळा दिवस पाळावा असे या मंडळींना वाटले नाही. भाजपास प्रिय असलेल्या नटीने मुंबईचा अपमान केला तरी हे गप्प. त्या अर्णब गोस्वामीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढले तरी हे त्या देशद्रोह्याच्या बाजूने उभे राहिले. भाजपच्या अधःपतनाचा शेवटचा अंक अशा पद्धतीने सुरू झाला आहे व त्या नाट्यात त्यांनी राज्यपालांना खलनायकाची भूमिका दिली आहे.’ असा आरोप शिवसेनेन केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उद्या लोकसभेत महत्त्वाची विधेयके पास होण्याची शक्यता, भाजपचा खासदारांना व्हीप जारी
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- पुन्हा स्टेडिअमवर कलकलाट ! प्रेक्षकांच्या आगमनासाठी बीसीसीआय आतुर, शेअर केला व्हिडिओ
- “शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतान ची साजरी करणार का?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
