Share

भारत आणि इंग्लंड संघात आज होणार काट्याची टक्कर ; भारतीय संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई :भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना काही दिवसांपूर्वी पार पडला. चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

इंग्लंच्या संघाने पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारतीय संघ 197 धावाच करू शकल्यामुळे टीम इंडियाला तब्बल 227 धावांनी हार पत्करावी लागली. या विजयासोबतच इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1 – 0 अशी आघाडी मिळवली आहे. या पराभवामुळे भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे.

त्यामुळे आजपासून (१३ फेब्रुवारी) चेन्नईत सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उरतू शकतो. दुसरीकडे इंग्लंड संघदेखील त्यांची विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर/कुलदीप यादव, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह

इंग्लंडची संभावित प्लेइंग इलेव्हन-
डोमिनिक सिब्ली, रॉरी बर्न्स, डॅनियल लॉरेन्स, बेन स्टोक्स, जो रूट (कर्णधार), ऑली पोप, बेन फोक्स (यष्टीरक्षक), मोईन अली, जॅक लीच, ख्रिस वोक्स, ऑली स्टोन/स्टुअर्ट ब्रॉड

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!