Share

“तुम्ही माझी मागील १०-१५ सामन्यांतील कामगिरी बघा” ; रहाणेच सडेतोड उत्तर

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना काही दिवसांपूर्वी पार पडला. चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सपशेल अपयशी ठरला तर या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ १ धाव करू शकला, तर दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही.

यावरच रहाणे म्हणाला, माझ्या भारतातील कामगिरीबाबत नेहमीच चर्चा होते. मात्र, आता आम्ही दोन वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी सामने खेळत आहोत. आमची अखेरची भारतातील कसोटी मालिका ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाली होती. त्या मालिकेतील मी चांगली कामगिरी केल्याचे तुम्हाला दिसेल.

पुढे तो म्हणाला, माझ्यासाठी संघाचे यश सर्वात महत्वाचे आहे. माझ्या कामगिरीचा संघाला कसा फायदा होऊ शकेल, या गोष्टीचा मी विचार करतो. तुम्ही माझी मागील १०-१५ सामन्यांतील कामगिरी बघा. मी या सामन्यांत धावा केल्याचे तुम्हाला दिसेल, असेही रहाणेने नमूद केले. तसेच त्याने विराट कोहलीच्या जागी भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवण्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!