🕒 1 min read
जालना : जालना ते देऊळगावराजा रोडवर जामवाडी शिवारात भारधाव कार विहिरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त ब्रीझा कार (एमएच २२ एएम २७०१) ही परभणीची असून ती बीडकडून बुलडाण्याला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जालन्याहून देऊळगावराजाकडे जाताना भरधाव वेगात असलेली कार जामवाडीजवळ एका वळणावरून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळी. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केल.
मृतदेहाच्या खिशातील आधार कार्डवरून मृताचे नाव अब्दुल मन्नान शेख सगीर (बीड) आणि अझहर कुरेशी असल्याची माहिती आहे.
दरम्यान, ही कार ज्या विहिरीत कोसळली ती विहीर तुडुंब भरलेली होती. त्यामुळे कार बाहेर काढण्यात अडचण येत होती. अखेर क्रेनच्या सहाय्याने रात्री उिशरा अपघातग्रस्त कार विहिरातून बाहेर काढण्यात आली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- उद्या लोकसभेत महत्त्वाची विधेयके पास होण्याची शक्यता, भाजपचा खासदारांना व्हीप जारी
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- पुन्हा स्टेडिअमवर कलकलाट ! प्रेक्षकांच्या आगमनासाठी बीसीसीआय आतुर, शेअर केला व्हिडिओ
- “शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतान ची साजरी करणार का?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
