🕒 1 min read
औरंगाबाद : गेल्या काही वर्षापासून रखडलेला औरंगाबाद शहराचा समांतर जलवाहिनीचा प्रकल्प हा पुन्हा रखडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रद्द झालेल्या कामानंतर २९ कोटीत तडजोड झालेली असताना ठेकेदार कंपनीने औरंगाबाद महानगरपालिकेकडे पुन्हा पैशासाठी तगादा लावला आहे. वाढीव मोबदला जर मिळाला नाही तर कोर्टात जाण्याचा इशाराही या कंपनीने दिला आहे.
औरंगाबाद शहरात पाण्याची समस्या कायमस्वरुपी सुटावी म्हणून २०१४ मध्ये शहरात समांतर पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड (एसपीएमएल) या कंपनीने या योजनेचे काम मनपाकडून मिळवले होते. शहरात कार्यालय सुरू करत कंपनीने या जलवाहिनीचे कामही सुरू केले होते. पण काही महिन्यानंतर २०१५ मध्ये मनपाने ही योजना रद्द करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत घेतला. यामुळे योजना आणि कंत्राट दोन्ही रद्द झाले होते. यादरम्यान एसपीएमएल कंपनीने काही काम पुर्ण केले होते. झालेल्या कामाचा मोबदला म्हणुन एसपीएमएल कंपनीने मनपाकडे १३७ कोटी रुपयांची मागणी केली.
मात्र, मनपाने इतक्या किमतीचे काम झाले नाही असे कारण पुढे करत रक्कम देण्यास विरोध केला. यावेळी हे प्रकरण सोडवण्यासाठी लवादाची स्थापना झाली. तीन वर्षे हे प्रकरण लवादासमोर सुरु होते. याच वेळी सदर कंपनीच्या बँक गॅरंटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू होते. त्यामुळे योजनेच्या मोबदल्याचे प्रकरण तडजोड करुन संपवण्यात आले. या तडजोडीत मनपाने कंपनीला २९ कोटी देण्याचे ठरले होते. पण तडजोड झाली असताना एसपीएमएल कंपनीने मनपाकडे उर्वरित रकमेची मागणी केली आहे. आणि रक्कम न दिल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही दिला आहे. यामुळे मनपाने हे प्रकरण शासनाकडे सोपावण्याचे ठरवले आहे. यातुन शासनाने मार्ग काढावा अशी विनंती करणार असल्याचे मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- OLX वरून परप्रांतीयाचा शेतकऱ्याला गंडा, 52 हजारांची फसवणूक
- ‘मोदीजी शेतकऱ्यांच्या वाटेला जाऊ नका’
- घर किरायाने घेण्याच्या बहाण्याने घरमालकाची ऑनलाइन फसवणूक
- उद्या लोकसभेत महत्त्वाची विधेयके पास होण्याची शक्यता, भाजपचा खासदारांना व्हीप जारी
- सत्तेसाठी ढोंग करणारे नरेंद्र मोदी ढोंगीजीवी आहेत ; नाना पटोलेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
