🕒 1 min read
नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचीच प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित झाली होती. यानंतर हायकमांडने देखील त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून आज नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी केंद्र सरकार भाजपवर जोरदार प्रहार केला आहे
शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली उपद्रव करणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाना साधला होता. शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं’, असा आरोप देखील त्यांनी केला होता. ‘शेतकरी गरिबीत चाचपडत राहो, असे कोणालाही वाटत नाही. शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं’, असे मोदी म्हणाले होते.
याच पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर जोरदार प्रहर चढवला. “आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणत असेल तर सत्तेसाठी ढोंग करणारे नरेंद्र मोदी ढोंगीजीवी आहेत. सरकार आल्यावर नरेंद्र मोदींनी पहिलं पाप कोणाचं केलं असेल तर शेतकऱ्यांचे , स्वामिनाथन समितीच्या ६० शिफारशी कॉंग्रेसने स्वीकारल्या होत्या. तेवढ्यात निवडणूका लागल्या अन भाजप ने स्वामिनाथन आयोग लागू कारण्यासागे आश्वासन दिले अन सत्तेत येताच स्वामींनाथन समितीच्या शिफारसी फेटाळून देशातील अन्नदात्याचा विश्वासघात केला.”
अशा प्रकारचा घणाघात कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर केला. यामुळे नाना पटोलेंच्या कार्यकाळात भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा सामना जोरदार रंगणार एवढे मात्र नक्की आहे. आगामी काळात भाजपच्या वतीने याला कसे प्रतिउत्तर दिल जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारत-चीन मुद्द्यावर राहुल गांधींनी मोदींना विचारले प्रश्न !
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- तामिळनाडू : फटाका फॅक्टरीतील स्फोटात 11 ठार, PM-CM कडून मदत जाहीर
- जालना: ओपीडी सुरू, मात्र जिल्हा रुग्णालयाकडून ना प्रसिद्धिपत्रक, ना आवाहन; रुग्णांना मनस्ताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
