🕒 1 min read
चेन्नई : कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून पहिल्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. आणि दुसरा कसोटी सामनाही याच मैदानावर खेळवला जाणार आहे. मुख्य बाब म्हणजे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून जगभरात टाळेबंदी लागू झाली. याचा मोठा फटका क्रिकेट विश्वालाही बसला होता. अशात प्रेक्षकांविना बंद स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येत होते. मात्र भारत आणि इंग्लंड संघात १३ फेब्रुवारी पासून होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बीसीसीआयने ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे.
मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच भारतातील सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची अनुमती दिली गेली आहे. म्हणून जवळपास १५ हजार प्रेक्षकांनी गजबजलेला दुसरा सामना हा खूप खास ठरणार असून तितकाच भावनिक देखील असेल. या परिस्थितीला लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या सामन्याच्या एक दिवस आधी शुक्रवारी (१२ फेब्रुवारी) अत्यंत भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.
Dear #TeamIndia fans we've missed you and we are now all set to welcome back crowds to cricket for the second Test.
Can't wait to have you roaring at The Chepauk tomorrow ????????@Paytm #INDvENG pic.twitter.com/7q4S1hPXrB
— BCCI (@BCCI) February 12, 2021
बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांच्या स्वागतार्ह पोस्ट करण्यात आला असून त्यात स्टेडियमच्या रिक्त खुर्च्या दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “आम्ही भारतीय संघाच्या चाहत्यांना खूप मिस केले आहे. आता दुसऱ्या कसोटीद्वारे तुमचे स्वागत करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. पुन्हा एकदा स्टेडियममध्ये तुमचा आवाज ऐकण्यास आम्ही आतुर झालो आहोत.
महत्वाच्या बातम्या
- उद्या लोकसभेत महत्त्वाची विधेयके पास होण्याची शक्यता, भाजपचा खासदारांना व्हीप जारी
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- तामिळनाडू : फटाका फॅक्टरीतील स्फोटात 11 ठार, PM-CM कडून मदत जाहीर
- “शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतान ची साजरी करणार का?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
