🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी याआधीच कार्यक्रमांच्या आयोजनाची तयारी झाली आहे.
मात्र, बुधवारी राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. भाजप, मनसेसह राज्यातील शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. शिवभक्तांच्या रोषानंतर शिवजयंतीच्या कार्यक्रमाला १० लोकांची उपस्थित असावी असा निर्णय नजरचुकीने झाल्याचं सांगत राज्य शासनाने १०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली.
तर, बाईक रॅली, पोवाडे, इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे, राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या प्रमाणात पार पडला. यावेळी काँग्रेसने मुंबईत शक्तिप्रदर्शन देखील केले. शेकडो कार्यकर्ते, वाहनांची रॅली, स्वतः नाना पटोले विनामास्क, तर मंचावर एकाच वेळी दीडशेहुन अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी, असं चित्र पाहायला मिळालं.
यावरून आता पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. “शिवजयंती हा आपला वर्षा तील सर्वात मोठा सण. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरविणारे, बार ची वेळ सारखी वाढवून देणारे, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंती ला नियमावली.” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले, “आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतान ची साजरी करणार का? वेळीच हि नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका.”असा इशारा देखील महाविकस आघाडी सरकारला दिला आहे.
आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतान ची साजरी करणार का? वेळीच हि नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका.@CMOMaharashtra ,@AnilDeshmukhNCP ,@abpmajhatv ,@News18lokmat ,@zee24taasnews ,@TV9Marathi
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) February 12, 2021
महत्वाच्या बातम्या
- उद्या लोकसभेत महत्त्वाची विधेयके पास होण्याची शक्यता, भाजपचा खासदारांना व्हीप जारी
- 100 हून जास्त खेळाडू राज्य सरकारला परत करणार ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’
- निवडणूक आली अन् ‘या’ भाजपशासित राज्यात सरकारने पेट्रोल-दारू स्वस्त केली!
- तामिळनाडू : फटाका फॅक्टरीतील स्फोटात 11 ठार, PM-CM कडून मदत जाहीर
- ‘शेतकऱ्यांपुढे इंग्रज टिकू शकले नव्हते, मग मोदी कोण लागून गेलेत?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
