🕒 1 min read
नवी दिल्ली- मागील ९ महिन्यांपासून भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये सीमासंर्घषामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता हा तणाव निवळण्यास सुरूवात झाली आहे. २४ जानेवारीला लष्कराच्या कमांडर स्तरावरील बैठकीतील एकमतानुसार सैन्य माघारी घेण्यात येत आहेत. ही चर्चेची नववी फेरी होती. याआधीच्या आठ बैठका निष्फळ ठरल्या होत्या.
दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चीनी सैन्य अत्यंत वेगानं LAC वरुन मागं सरकत आहे. चीन आणि भारत यांच्यात झालेल्या सहमतीनुसार चीननं पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन माघार घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसात चीननं या भागातून 200 रणगाडे हटवले असल्याचं वृत्त आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल यांनी चीनमधील आपल्या समपदस्थांची चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सैन्य पातळीवर सहमती झाली.वारंवार मुजोरी करणारा चीन हा अचानक सैन्य मागे घेण्यासाठी कसा तयार झाला याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, आता याबाबतची काही माहिती माध्यमांना मिळू लागली आहे. पूर्व लडाखबाबतच्या आपल्या भूमिकेवर भारत ठाम राहिला. चीनचा कुठलाही दावा मान्य करायचा नाही, आपली एक इंचही भूमी सोडायची नाही, हा भारताचा निर्धार कायम होता. त्यानंतर चीनला अखेर नमते स्वीकारुन माघारी फिरावे लागले, असे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- “वाल्मीची पुनर्रचना करून व्यवस्थापन जलसंपदा विभागाकडे द्यावे”
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- जालन्यातील सिडकोचे प्रकल्प रद्द करू नये; आमदार अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
