🕒 1 min read
मुंबई : सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ जोरदार व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारणही तसेच आहे. हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री जान्हवीचे चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत. या व्हिडिओ मध्ये जान्हवी ई-रिक्षा चालवताना दिसते आहे.
चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवर जान्हवी ई-रिक्षा चालवताना दिसत आहे. या रिक्षात आणखी काही लोक मागे बसलेले दिसतायेत. जान्हवी सध्या तिच्या ‘गुड लक जेरी’ सिनेमाची शूटिंग करते आहे. सेटवरचे तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, जे मजेदार आहेत.
https://www.instagram.com/p/CK1NIlPFEk8/?utm_source=ig_web_copy_link
सध्या जान्हवी तिच्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या सेटवरील जान्हवीच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओत जान्हवी ड्रेसमध्ये ई-रिक्षा चालवताना दिसतेय. हा व्हिडीओ पोस्ट करताना जान्हवी कपूरने लिहिले, सिनेमाचे शूट्स मजेदार असते. सिद्धार्थ सेन गुप्ता या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत. दीपक डोब्रियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंह हे या सिनेमात दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती रंग यलो प्रोडक्शन, लिका प्रॉडक्शन आणि सनडियल एंटरटेन्मेंट यांनी केली आहे.
https://www.instagram.com/p/CKx-tdJl7Mx/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर
- बीडमध्ये विजेचे दोन बळी; कर्नाटकात कामासाठी गेलेला तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
- जाणून घ्या भाजपा खासदारांनी सांगितलेला ‘नरेंद्र मोदी’ नावाचा फुल फॉर्म !
- केंद्र सरकार Twitter विरोधात आक्रमक; काही बड्या अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता
- लोकोपयोगी कामांसाठी उदयनराजेंची धडपड; केंद्रीय मंत्र्यांच्या भेटींचा लावला धडाका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
