Share

“जर एखाद्या ट्विटवरुन ‘या’ सेलिब्रिटींना कुणी जज करत असतील, तर ते देशविरोधी आहेत”

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर देशातही एक आवाज उठविला गेला, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडुलकरने. “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना देशाबद्दल माहित आहे आणि देशवासीयांनी निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” अशी प्रतिक्रिया सचिनने दिली होती. सचिनच्या या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे.

सचिनच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. सचिनसह इतरही खेळाडू आणि सेलिब्रिटींनी ट्विट केलं होतं, या ट्विटला राजकीय वळण लागलं. त्यामुळे, सचिनसह सेलिब्रिटींवर टीका करण्यात आली. पण, भाजपा नेत्यांनी या सेलिब्रिटींचं समर्थन केलं.

सचिनसह इतरही सेलिब्रिटींच्या ट्विटचे समर्थन करताना, देशाची सार्वभौमत्वता आणि अखंडता याबद्दल बोलण्यात चुकीचं काय, असे म्हणत भाजपा नेत्यांनी समर्थन केले होते. आता, अमरावतीच्या खासदार नवनीत कौर यांनीही सचिनसह सेलिब्रिटींच्या ट्विटचं समर्थन केलंय. दिल्लीत सध्या सुरू असलेल्या अधिवेशनासाठी त्या दिल्लीत आहेत. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलंय. देशाचा अभिमान असलेले राष्ट्रीय नायक देशाच्या बाजून आहेत की विरोधात. हे इतर कुणीही सिद्ध करण्याची गरज नाही. या देशात लोकशाही आहे, प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा, मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या ट्विटवरुन या सेलिब्रिटींना कुणी जज करत असतील, तर ते देशविरोधी आहेत, असे नवनीत कौर यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!