Share

जवान शहीद होत आहेत आणि त्यानंतरही क्रिकेट सामन्यांची अपेक्षा करता ?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधी उल्लंघन आणि त्यात भारतीय जवानांना आपले प्राण गमवावं लागणं हे भारत-पाक सामन्यांसाठी योग्य वातावरण नसल्याचं स्वराज यांनी म्हटलंय. अतिरेकी हल्ले करुनही पाकिस्तान क्रिकेट सामने खेळण्याची अपेक्षा कशी करु शकतं? असा थेट सवाल सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला विचारला आहे.परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आणि सुषमा स्वराज यांनी भारताच्या शेजारील राष्ट्रांशी संबधांवर नुकतीच पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली.सुषमा स्वराज यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात त्रयस्थ देशात क्रिकेट सामने खेळवण्याच्या उरलेल्या आशा देखील मावळल्या आहेत .

काय म्हणाल्या सुषमा स्वराज?

“मानवतेच्या दृष्टीकोनातून मध्यंतरी दोन्ही सरकारने आपल्या कैदेत असलेल्या इतर देशांतील कैद्यांना सोडण्यावर एकमत निर्माण झालं होतं. यावेळी भारताने काही पाकिस्तानी नागरिकांना भारतात उपचार घेण्यासाठी तात्काळ वैद्यकीय व्हिजाही उपलब्ध करुन दिला होता. मात्र त्यानंतरही पाकिस्तान सीमेपल्याडहून कुरापती करतच आहे. त्यांचं हे वागण क्रिकेट मालिका खेळण्यासाठी निश्चीतच योग्य नाही . हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी कैदेत असलेल्या कुलभुषण जाधव याच्या परिवाराला पाकिस्तानमध्ये अधिकाऱ्यांकडून चांगलाच त्रास देण्यात आला. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने होणं अशक्य असल्याचे संकेत सुषमा स्वराज यांनी दिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!