Share

…तर महाराष्ट्र सरकारने आम्हाला देखील अटक करावी; फडणवीस कडाडले

Published On: 

मुंबई : देशाबाहेरील कलाकारांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केल्यानंतर आता या आंदोलनाने वेगळं वळण घेतलं आहे. देशाबाहेरील कलाकारांनी देशाच्या अंतर्गत मुद्द्यावर भाष्य करण्याची गरज नाही. देश समर्थ आहे, असं सांगत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अक्षय कुमार, अजय देवगन, सायना नेहवाल यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी ट्विट केलं होतं.

मात्र, या सेलिब्रिटींच्या ट्विटचा आशय सारखाच आहे. हा आशय सारखा असल्याने त्यांना कोणी हे करायला सांगितले का ? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थितकेला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

यानंतर भाजपने आक्रमक पवित्र घेत अनिल देशमुख व काँग्रेसवर घणाघात केला आहे. यामध्ये भारतरत्नाने सन्मान केलेल्या सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांचा देखील समावेश असल्याने भाजपने जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडी सरकारवर जळजळीत टीका केली आहे.

‘सेलिब्रिटींच्या ट्विट्सच्या चौकशीची मागणी करणाऱ्यांची आणि चौकशीला मंजुरी देणाऱ्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यांच्या मानसिक संतुलनाची तपासणी झाली पाहिजे. कारण, सेलिब्रिटींनी आपल्या ट्विटमध्ये देशाच्या सार्वभौमत्वाला तडा जाऊ देणार नाही असं होतं. याहून अधिक काही नव्हतं. मग यावर काय चौकशी केली जाणार ?’ असा सवाल त्यांनी विचारला आहे.

तर, ‘देशातील सार्वभौमत्वावर हल्ला होऊ देणार नाही, हे म्हणणं जर चुकीचं असेल तर महाराष्ट्र सरकारने आम्हा सगळ्यांना अटक केली पाहिजे.’ असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!