🕒 1 min read
नवी मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यात नवी मुंबई महापालिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष नवी मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबईत भाजपचे जेष्ठ नेते गणेश नाईक यांच्या कुटुंबाचं वर्चस्व आहे.
नाईक यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश घेतला होता, त्यानंतर महापालिकेतील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता कोसळली, अनेक राष्ट्रवादी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यामुळे भाजपाला नवी मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवता आला. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेवक गणेश नाईकांची साथ सोडून पुन्हा स्वगृही परतत असल्याचं दिसून येत आहे.
आतापर्यंत भाजपाच्या १४ नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. या राजकीय घडामोडीमुळे भाजपा नेते गणेश नाईक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे भाजपा विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी हे राजकारण चांगलंच रंगल्याचं दिसून येत आहे.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेविकेने शिवसेनेचं शिवबंधन सोडून भाजपमध्ये घरवापसी केली आहे. नगरसेविका सुरेखा नरबागे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झााल्या आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी गणेश नाईक सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. तर, ‘भाजपमधून इतर पक्षात गेलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपात येण्यास इच्छुक आहे,’ असा दावा भाजप आमदार गणेश नाईकांनी केला आहे. त्यामुळे नाईकांची ही नवी राजकीय खेळी कितपत यशस्वी ठरणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- दरबार भरला पण राजाची प्रतिक्षा! पोलीस आयुक्तांमुळे नागरिक ताटकळले
- चहावाल्याच्या मुलाने मिळवले जिल्ह्यातील पहिले सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत धडक
- फडणवीसांनी घेतलेल्या आणखीन एका निर्णयात ठाकरेंकडून बदल
- दारूण पराभवानंतर आता ‘या’ गेमचेंजर खेळाडूला संधी देण्याची मागणी धरू लागली जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
