🕒 1 min read
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. चेन्नईच्या चेपक मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
इंग्लंच्या संघाने पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारतीय संघ 197 धावाच करू शकल्यामुळे टीम इंडियाला तब्बल 227 धावांनी हार पत्करावी लागली. या विजयासोबतच इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1 – 0 अशी आघाडी मिळवली आहे.
त्यांनतर आता कर्णधार विराट कोहलीला आणखी एक धक्का बसला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत विराटची आता पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. चेन्नई कसोटीतील द्विशतकवीर जो रूट तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. रूटनं ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनला मागे टाकले. IPL 2021च्या लिलावात एन्ट्री, पण खराब कामगिरीमुळे अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या संघात निवड नाही
https://www.instagram.com/p/CLGrW8Pgw9d/?utm_source=ig_web_copy_link
इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं पहिल्या कसोटीत २१८ धावांची मॅच विनिंग खेळी केली. यामुळे त्यानं क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा केली आहे. रूट ८८३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर सरकला आहे. केन विलियम्सन ( ९१९) व स्टीव्ह स्मिथ ( ८९१) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लाबुशेन ८७८ गुणांसह चौथ्या, तर पाचव्या स्थानावर असलेल्या विराटच्या खात्यात ८५२ गुण आहेत. अजिंक्य रहाणे टॉप टेनमधून बाहेर गेला आहे, चेतेश्वर पुजाराचीही एक स्थान घसरण झाली असून तो ७५४ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
https://www.instagram.com/p/CLGsBRVgqwV/?utm_source=ig_web_copy_link
भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतनं पहिल्या कसोटीत ९१ धावांची खेळी केली आणि त्याचा फायदा त्याच्या क्रमवारीत झाला. तो ७०० गुणांसह १३व्या क्रमांकावर आहे, परंतु यष्टिरक्षक-फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे. शुबमन सात स्थानांच्या सुधारणेसह ४०व्या क्रमांकावर आला आहे. वॉशिंग्टन सुंदरही दोन स्थान वर सरकून ८१व्या क्रमांकावर आला आहे. गोलंदाजांमध्ये आर अश्विन व जसप्रीत बुमराह या भारतीय खेळाडूंनी एक स्थानाची सुधारणा केली आहे. अश्विन ७७१ गुणांसह सातव्या, तर बुमराह ७६९ गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- दरबार भरला पण राजाची प्रतिक्षा! पोलीस आयुक्तांमुळे नागरिक ताटकळले
- चहावाल्याच्या मुलाने मिळवले जिल्ह्यातील पहिले सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत धडक
- फडणवीसांनी घेतलेल्या आणखीन एका निर्णयात ठाकरेंकडून बदल
- दारूण पराभवानंतर आता ‘या’ गेमचेंजर खेळाडूला संधी देण्याची मागणी धरू लागली जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
