परभणी : ऑनलाइन व्यवहाराबाबत नेहमी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येते. परंतु आता एका माजी खासदाराचीच ऑनलाइन फसवणूक झाल्याचे वृत्त समोर आले. परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांची तब्बल 49 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे.
मोबाईलचे सीमकार्ड रिचार्ज करण्याकरिता अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर काही क्षणातच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 49 हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचा खळबळजनक प्रकार घडला. रेंगे यांनी नानलपेठ पोलिस ठाणे गाठून आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, रेंगे यांना मंगळवारी एक मॅसेज आला. त्या मेसेजमध्ये तुमच्या दोन्ही मोबाईलचे सीमकार्ड बंद पडले आहेत. त्यामुळे ते पुन्हा कार्यान्वित करा, असा मजकूर होता. यानंतर रेंगे यांनी लगेच सीमकार्ड रिचार्ज करण्याकरिता सोपान फाळके यांना पाठवले. यादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून दोन्ही सिम कार्ड ऍक्टिव्हेट करण्याकरिता केवळ दहा रुपयांचे रिचार्ज करावे लागेल असे सांगितले. याकरिता एक मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे लागेल असे सांगितले.
त्यामुळे तुकाराम रेंगे यांनी ती सूचना सोपान फाळके यांना सांगितली. तेव्हा सोपान पाळके यांनी सूचनेप्रमाणे अॅप्लिकेशन डाऊनलोड केले. दहा रुपयांचे रिचार्ज करण्यासाठी त्यांनी एसबीआयच्या डेबिटकार्डचा वापर केला. तेव्हा काही क्षणातच सोपान फाळके यांच्या स्टेट बँकेच्या खात्यावरून 49 हजार रुपये काढून घेतल्याचा मॅसेज आला. या मॅसेजने रेंगे यांना धक्काच बसला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नानलपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- दरबार भरला पण राजाची प्रतिक्षा! पोलीस आयुक्तांमुळे नागरिक ताटकळले
- चहावाल्याच्या मुलाने मिळवले जिल्ह्यातील पहिले सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत धडक
- फडणवीसांनी घेतलेल्या आणखीन एका निर्णयात ठाकरेंकडून बदल
- दारूण पराभवानंतर आता ‘या’ गेमचेंजर खेळाडूला संधी देण्याची मागणी धरू लागली जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
