Share

दारूण पराभवानंतर आता ‘या’ गेमचेंजर खेळाडूला संधी देण्याची मागणी धरू लागली जोर

Published On: 

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. चेन्नईच्या चेपक मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

इंग्लंच्या संघाने पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र भारतीय संघ 197 धावाच करू शकल्यामुळे टीम इंडियाला तब्बल 227 धावांनी हार पत्करावी लागली. या विजयासोबतच इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1 – 0 अशी आघाडी मिळवली आहे.

या पार्श्वभूमीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये कुलदीप यादवला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी केली आहे.कुलदीप यादवला संधी द्यायची असेल, तरी वॉशिंग्टन सुंदरला टीमबाहेर ठेवू नये, असंही गावसकर यांनी सांगितलं आहे. सुंदरच्या बॉलिंगमध्ये काही त्रुटी आहेत, पण त्या खेळून आणि अश्विनबरोबर चर्चा करून दूर होतील, असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला आहे.

गावसकरांनी सांगितल्याप्रमाणे जर कुलदीप यादवला संधी दिली, तर शाहबाज नदीमला बाहेर बसावं लागू शकते. नदीमने या टेस्टमध्ये 4 विकेट घेतल्या, तरी त्याने तब्बल 233 रन दिले आहेत. दरम्यान, पहिल्या सामन्यातील पराभवानंतर विराट कोहलीचं कर्णधारपद काढून घेण्याची मागणी ट्विटरवर काही क्रीडा चाहते करु लागलेले आहेत. विराटचं कर्णधारपद काढून घेऊन अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!