Share

अपात्र शेतकऱ्यांचे धाबे दणाणले; तब्बल २.३० कोटींची वसुली

Published On: 

उस्मानाबाद : केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेतंर्गत गरजु शेतकऱ्याना वर्षाला ६००० रुपये मदत निधी मिळत होता. पण या योजनेचा लाभ अनेक अपात्र शेतकऱ्यांनी घेतला. या शेतकऱ्यांकडुन पैसे परत जमा करावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांनी त्यांना नोटीस बजावल्या होत्या. पण अपात्र शेतकऱ्यांकडून अपेक्षित रक्कम जमा झाली नाही, तर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सांगितले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी, करदाते, डॉक्टर, अभियंते, गरजू शेतकरी नसलेल्या व्यक्तींना या योजनेतून वगळण्यात आले होते. मात्र, असे असतानाही जिल्ह्यातील ९ हजार ९८० अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेतून शासनाचे ९ कोटी १ लाख ९० हजार रुपये लाटले असल्याचे उघड झाले आहे. या अपात्र लाभार्थींना पैसे परत जमा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांनी नोटीस बजावल्या होत्या. या अंतर्गत जिल्ह्यातील २ हजार ३९७ अपात्र शेतकऱ्यांकडून २ कोटी ३० लाख ९२ हजार रुपयांची वसुली करण्यात यश आले.

उर्वरित ७ हजार ५८३ शेतकऱ्यांकडून ६ कोटी ७० लाख ९८ हजार रुपये वसूल करण्यात येणार आहेत. अपात्र शेतकऱ्यांनी जर १५ दिवसांच्या आत रक्कम न भरल्यास खाते गोठवून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचा निधी चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो. जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे जवळपास दोन लाख लाभार्थी आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!