🕒 1 min read
नवी दिल्ली : राज्यसभेत काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासहीत चार सदस्यांना निरोप काल देण्यात आला या दरम्यान गुलाम नबी आझाद यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झालेले दिसले.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटनांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी आपल्या काही आठवणी मोदी यांनी सदनात सांगितल्या. ‘त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. गुलाम नबी आझाद यांनी मला त्यादिवशी फोन केला… सर्वात अगोदर मला गुलाम नबी यांचा फोन आला… तो फोन केवळ सूचना देण्यासाठी नव्हता… त्यावेळी त्यांना फोनवरही रडू आवरणं कठीण झालं होतं’, असं सांगताना पंतप्रधान मोदीही भावूक झाले.
दरम्यान,एक कणखर नेता अशी प्रतिमा असलेले मोडी यापूर्वी देखील अनेकदा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.गुजरातमध्ये झालेला भूकंप,बाळासाहेब ठाकरे,गोपीनाथ मुंडे,अटल बिहारी वाजपेयी तसेच प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर देखील मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते.
चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही.याप्रसंगी मोदी इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.इस्रो प्रमुख के. सिवन यांना अश्रू अनावर झाले. पंतप्रधान मोदींनी त्यांना जवळ घेत मिठी मारली, तसेच धीर दिला. यावेळी देखील मोदी सुद्धा भावूक झाले होते. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, भारताला तुमचा अभिमान आहे. मी तुमची मनस्थिती जाणतो, निराश होऊ नका. देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सर्व शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनातील जेष्ठ नागरिकाचा उल्लेख करताना देखल याच अधिवेशनात मोदी काहीसे भावूक झाले होते. शेतकऱ्यांना आवाहन करताना ते म्हणाले होते कि आम्ही, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकरी आंदोलकांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी चर्चा सुरु आहेत. मिळून मिसळून चर्चा करु, वृद्ध शेतकऱ्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये याची काळजी घ्यावी. असं मोदी म्हणाले.
आज मी संसदेतूनही आवाहन करतो, चर्चेने मार्ग काढू, तुम्हाला लोकशाहीत आंदोलनाचा हक्क आहे, आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचं आहे, मागे नाही. पक्ष-विपक्ष असो, या सुधारणांना आपण संधी द्यायला हवी, या परिवर्तनाने लाभ होतो की नाही हे पाहावं लागेल, काही कमतरता असेल तर त्यात सुधारणा करु, आपण काही दरवाजे बंद करत नाहीत. मंडई अधिक प्रतिस्पर्धी होतील, लाभ होईल, MSP होता, आहे आणि राहील. या सभागृहाच्या पवित्र्यातून आम्ही ही ग्वाही देतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
यापूर्वी जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाला भारतात प्रारंभ झाला त्यावेळी शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं.त्यावेळी कोरोना काळाच्या आठवणी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पहायला मिळाले होते.कोरोना काळात आरोग्य कर्मचारी, कोरोना योध्ये आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ज्या पध्दतीने सेवा बजावली आणि ज्या पध्दतीने बलिदान दिले त्याच्या आठवणीने पंतप्रधान मोदी भावुक झाले होते.
नुकताच कर्नाटकातील धारवाडमध्ये पिकनिकसाठी निघालेल्या बसवर काळाने घाला घातला होता. धारवाड जिल्ह्यात इट्टीगट्टी या ठिकाणानजीक मिनीबस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. धारवाडमधील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला. 11 जणांच्या मृत्यूने त्यावेळी मोदीही भावूक झाले होते.
बीड आणि बीड बाहेरच्या जवळपास साडेतीनशे पेक्षाही जास्त गुन्ह्यांचा तपास लावणारा बीड पोलीस दलातील श्वान रॉकी च्या निधनानंतर देखील पंतप्रधान काही प्रमाणात भावूक झाले होते. मागच्या 8 वर्षापासून रॉकी बीड पोलिसांच्या मदतीसाठी काम करत होता, मात्र आजारपणामुळे त्याचं 15 ऑगस्ट रोजी निधन झालं. रॉकीने 2016साली कर्नाटकच्या मैसूरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले होते. खून आणि दरोड्यासारख्या मोठ्या गुन्ह्याचा तपास रॉकीने लावला होता. 30 ऑगस्ट 2020 रोजी मन की बात या कार्यक्रमात मोदी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- मायदेशातील पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक दणका !
- ‘राजकीय कुरघोडीसाठी इतका करंटेपणा कुठून येत असेल?’
- जयसिद्धेश्वर यांच्या अडचणीत वाढ; खासदारकी धोक्यात !
- कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
- ट्विटरला दणका देणारे स्वदेशी ‘Koo’ ऍप नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
